रांजणी, (वार्ताहर) – स्विरल रिसोर्ट (डिंभे, ता. आंबेगाव) येथे प्राज्य फाउंडेशन व शिक्षणा फाउंडेशनच्या वतीने आयोजित उमंग प्रश्नमंजूषा स्पर्धा २०२४ मध्ये प्राथमिक गटात भागडी शाळेने तृतीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेसाठी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सहकार्य लाभले. स्पर्धा मंगळवार (ता.१९) रोजी संपन्न झाल्या. स्पर्धेतील प्राथमिक गटात भागडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने उच्च प्राथमिक गटात बीट पातळीवर प्रथम तर तालुका पातळीवर तृतीय क्रमांक मिळविला. या प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्राज्य फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विजय कुमार रामचंद्रन तसेच सीईओ मंदार पोकळे व विस्तार अधिकारी शत्रुघ्न जाधव केंद्रप्रमुख जंगले,
अंकिता ढमढेरे, चंद्रकांत अमुंडकर, अभिषेक घोडेकर, बाळू काठे यांच्या हस्ते मेडल (पदक) व शाळेसाठी भव्य चषक तसेच मार्गदर्शक शिक्षकांस चषक देऊन गौरविण्यात आले. संघातील सहभागी विद्यार्थी समिक्षा आगळे, कृतिका आदक, श्लोक उंडे, आर्यन आगळे, आराध्या शिंदे यांनी शाळेचे नेतृत्व केले.
तर बाळासाहेब गिलबिले, आशा वाळके, स्वाती शिंदे, लालन गायकवाड, सिध्दी रावळ यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्याच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थ्यांचे पालक साहेबराव शिंदे, विस्तार अधिकारी काळूराम भवारी, गजानन पुरी व गट शिक्षणाधिकारी सविता माळी यांनी अभिनंदन केले.