सोमाटणे, (वार्ताहर) – पर्यावरण संवर्धन समिती, पुणे (ईसीए) यांच्यातर्फे सोमाटणे येथील जिल्हा परिषद शाळेस सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोलर पॅनल भेट देण्यात आले. त्यामुळे, शाळेच्या वीजबिलाचा प्रश्न सुटला आहे.
सोमाटणे येथील जिल्हा परिषदेच्या सोलर पॅनलचे उद्घाटन मावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच नवनाथ मुऱ्हे, उपसरपंच नितीन मुऱ्हे, दारुंब्रे केंद्रप्रमुख प्रकाश गोफणे व बेबडओहोळ केंद्रप्रमुख सविता शिंदे,
यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संस्थेतर्फे तालुक्यातील दहा शाळांना सोलर पॅनलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, अशी माहिती संदीप सकपाळ यांनी दिली.