पुणे विद्यापीठाच्या सूचना : सर्व शैक्षणिक संस्थांना बंधनकारक
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांबरोबरच संलग्न असलेल्या विविध शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांच नामफलक व प्रसिद्ध करावयाची अन्य महत्त्वाची माहिती मराठी भाषेत लावण्याच्या सूचना कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिल्या आहेत. त्याकरिता राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अध्यादेशाचा संदर्भ दिला आहे.
राज्याच्या उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण व कला संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये नामफलक तसेच संस्थेच्या माहितीबाबत अथवा अन्य विविध बाबींचे फलक लावण्यात आले आहेत.
उच्च शिक्षण संचालनालयाच्या सर्व अकृषी, सर्व अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे, मॉडेल डिग्री महाविद्यालये व परिसंस्था तसेच तंत्र शिक्षण संचालनालय व कला संचालनालय यांच्या अधिपत्याखाली असलेली शासकीय, सर्व शासकीय, अशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका अभ्यासक्रमांच्या संस्थांमध्ये सर्व नामफलक मराठी भाषेतून लावणे आवश्यक आहे.