रमेश देसाई मेमोरियल सब-ज्युनियर टेनिस स्पर्धा :
मुंबई – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 13व्या योनेक्स सनराईज-एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत क्रिश त्यागी, रायन कुथार्थ, माही खोरे व वामीका शर्मा यांनी मानांकीत खेळाडूंवर विजय मुळवत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपुर्व फेरीत मुलांच्या गटात केरळच्या बिगर मानांकीत रायन कुथार्थ याने महाराष्ट्राच्या नवव्या मानांकीत निल जोगळेकरचा 6-1, 6-4 असा एकतर्फी पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. आकराव्या मानांकीत कर्नाटकच्या क्रिश त्यागीने तेलंगणाच्या आठव्या मानांकीत प्रणित भाटीयाचा 7-6(1), 6-4 असा टायभेक मध्ये पराभव करत आगेकुच केली. महाराष्ट्राच्या दुस-या मानांकीत अर्णव पापरकरने महाराष्ट्राच्याच वेदांत भसीनचा 7-6(3), 6-1 असा टायब्रेकमध्ये पराभव करत आगेकुच केली.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या बिगर मानांकीत माही खोरेने महाराष्ट्राच्याच आठव्या मानांकीत उर्वी काटेचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या दहाव्या मानांकीत वामीका शर्माने दिल्लीच्याच सहाव्या मानांकीत दिव्या अंगरीश हीचा संघर्षपुर्ण लढतीत 7-6(4), 3-6, 7-6(3) असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या सातव्या मानांकीत आस्मि आडकरने महाराष्ट्राच्याच आनंदी भुतडाचा 6-2, 6-1 असा तर ऐश्वर्या जाधवने गुजरातच्या एंजल पटेलचा 6-4, 6-3 असा पराभव करत आगेकुच केली.