पिंपरी – पिंपरीतील संत तुकाराम नगर येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय जवळ डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल शेजारी, कलाछंद संस्था, पुणे यांनी “राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत “जनजागृती तंबाखूजन्य पदार्थांपासून होणारे शारीरिक नुकसान याबाबत माहिती, मार्गदर्शन, व जनजागृतीपर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले.
हे पथनाट्य जिल्हा रुग्णालय, महाराष्ट्र शासन पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आले. अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवी, डॉ. राहुल मणियार, दिलीप करंजखेले, रवींद्र नागवेकर, शाहीर बाळासाहेब मालुसकर, कलाछंद संस्था, तसेच अनिता वाघचौरे यांनी सहभाग घेतला होता.