चिखली – विश्व कल्याण इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थी पर्यावरण संवर्धन समितीमार्फत विद्यार्थी व शिक्षकांनी पर्यावरण साप्ताह साजरा केला. त्यात विविध सोसायट्यांमधून ई-कचरा गोळा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
सप्ताहांतर्गत वृक्षारोपण, वृक्ष दिंडी, प्रवचन हे उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी अभंग विश्व, रस्टिक सोसायटी, ब्लू डायस व मीरा आर्केड या सोसायटीमधून 100 किलो ई-कचरा गोळा केला. तो नुकताच शहर पर्यावरण संवर्धन समितीकडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी समितीचे अध्यक्ष विकास पाटील, मुख्याध्यापिका गायत्री धामणेकर, दिपाली करंदीकर, राजेश्वरी पाटील, सोमेश्वर त्रिंबके आदी उपस्थित होते. विकास पाटील यांनी विद्यार्थ्यांना ई-कचऱ्याचे दुष्परिणाम समजून सांगितले. संचालिका नीलम मेहता व जितेंद्र मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात आला.