नगर -करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे. लॉकडाऊन मध्ये शाळा बंद आहेत. मात्र, जेव्हा शाळा सुरु होतील, तेव्हा प्रशासनाने दिलेल्या अटी-शर्तीचे पालन करून प्रशासननास सर्वोतपरी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आ. जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सावेडी येथील मार्केंडेय शिक्षण संस्थेस विद्यार्थ्यांना बसण्यास बेंचेस उद्योजक राहुल ठोंबरे, जितेंद्र गायकवाड, जीतू गायकवाड यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आ. जगताप यांच्या वाढदिवसानिमित्ताने सत्कार समारंभाला फाटा देऊन, शालेय वस्तु वाटपाचे आवाहन मित्र परिवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते.
येत्या काळात शाळा सुरु झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना सोशल डिस्टंसिंग मुळे लांबलांब बसवावे लागेल, तेव्हा होणारी अडचण लक्षात घेऊन, राहुल ठोंबरे, जितेंद्र गायकवाड, जीतू गायकवाड यांनी शाळेला बेंचेस देऊन वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.
यावेळी मार्कंडेय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद क्यादर, अरविंद चन्ना, मुख्याध्यापक गोरे, प्राथमिक मुख्याध्यापिका दगडे मॅडम व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.