संजय कडू
पुणे – देशातून पॉर्न हबवरील रहदारीत 95 टक्के वाढ झाली आहे. “बाल लैंगिक अत्याचार सामग्री’ नावाच्या अहवालात लॉकडाऊनपूर्वीच्या तुलनेत देशातील पॉर्न हबवरील वाहतुकीत (सर्च) 95 टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, राज्याच्या गृहमंत्रालयाने चाईल्ड पोर्नोग्राफीची गंभीर दखल घेतली आहे. जानेवारीच्या मध्यापासून चाईल्ड पोर्नोग्राफी विरुद्ध लढण्यास “ऑपरेशन ब्लॅकफेस’ सुरू केले. यामध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने 133 गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये 46 जणांना आयपीसी, आयटीऍक्ट आणि पोस्को अंतर्गत अटकही केली आहे.
लॉकडाऊन दरम्यान भुवन रिभू यांच्या इंडिया चाईल्ड प्रोटेक्शन फंड संस्थेच्या संशोधनात चाईल्ड सेक्सच्या सर्चच्या मागणीत जेरदार वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चाईल्ड पॉर्न विरुध्द जानेवारीच्या मध्यापासूनच विशेष “ऑपरेशन ब्लॅकफेस’ राबवण्यास सुरुवता केली होती. यामध्ये मुलांवर होणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या गेल्या. महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाने 133 असे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये 46 जणांना अटक केली. तर, इतर गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. नोंदवलेल्या 133 गुन्ह्यांपैकी एक अकोला येथील आहे. तर, 41 पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, परभणी, पुणे आणि नागपूर तसेच 91 गुन्हे मुंबई, कोल्हापूर, अमरावती, अहमदनगर, रायगड, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर, गोंदिया, बीड, भंडारा, परभणी. नंदुरबार, लातूर, ठाणे, ग्रामीण, अमरावती ग्रामीण, सोलापूर शहर, हिंगोली, नवी मुंबई, सांगली, रत्नागिरी, यवतमाळ असे आहेत. यामुळे ग्रामीण भागातही पॉर्नचे लोण पसरले असल्याचे दिसते.
—–
असा घेतला जातो शोध…
नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोने प्रत्येक राज्यात नोडल अधिकारी नेमले आहेत. महाराष्ट्रातही असा नोडल ऑफिसर आहे. नॅशनल सेंटर फॉर मिसिंग ऍण्ड एक्सप्लोझड चिल्डन (एनजीओ) जे फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्राम इत्यादी सोशल मीडिया प्लॅटर्फार्मवर लक्ष ठेवतात. ते बाल पोर्नोग्राफरच्या आयएसपी पत्त्याचा मागोवा ठेवत नॅशनल क्राईम ब्युरोला अलर्ट करतात. त्यानंतर ब्युरो पुढील कार्यवाहीसाठी नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधतात.
“चाईल्ड पोर्नोग्राफी संदर्भात पोस्को, आयटी ऍक्ट आणि आयपीसी कलमाअंतर्गत जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. चाईल्ड पोर्नोग्राफी शूट करणे, मटेरिअल स्टोअर करणे आणि ते पुढे पाठवणे यासाठी ही शिक्षा होऊ शकते. जागतिक पातळीवर चाईल्ड पोर्नोग्राफी सर्वच देशांत बॅन आहे. प्रत्येक देश चाईल्ड पोर्नोग्राफी संदर्भात वेगवेगळ्या मोहिमा राबवत असते. मात्र, कोणत्याच सरकारचे इंटरनेट सर्व्हरवर नियंत्रण नसल्याने ती रोखणे सरकारच्या नियंत्रणाबाहेर आहे.”
– ऍड. गौरव जाचक (सायबर तज्ज्ञ)