मुंबई – मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी आज अचानक शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. मुंबईत विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरालाही घेराव घातला. यावेळी मोठी गर्दी पाहता विद्यार्थ्यांना पागवण्यासाठी पोलीसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. मुंबईसारख्या ठिकाणी एवढी गर्दी तीही विद्यार्थ्यांची आणि अचानक घडलेल्या या घटनेने ठाकरे सरकारला घामटा फुटला नसता तरच नवल. पण हे सर्व विद्यार्थी आले कुठून, त्यांचे नेतृत्व कुणी केलं? कुणाच्या आवहानावर ते जमा झाले? असे अनेक प्रश्न पोलीसांना आणि सरकारलाही पडले.
मात्र दुपारनंतर या घटनेसंदर्भात हिंदुस्थानी भाऊचे नाव समोर आले. हा हिंदूस्थानी भाऊ नेमका कोण, तो कोणत्या पक्षाशी संबंधित आहे, त्याचा नेमका उद्देश काय आहे त्याचा शोध घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे आदोलन पेटण्यापूर्वी काही वेळ आधीच तिथे हिंदुस्तानी भाऊ आला होता. मात्र त्याला तिथे न थांबू देता पोलिसांनी तिथून बाहेर काढले. त्यानंतरच हे आंदोलन आणखी आक्रमक झाले. या हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी या ठिकाणाहून काढल्यानंतर हिंदुस्तानी भाऊने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, तो व्हिडिओ आता चांगलाच वायरल होत आहे.
विकास पाठक असे या हिंदुस्तानी भाऊचे नाव आहे. या हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप आहे. हिंदुस्तानी भाऊ बिग बॉसच्या सीझन 13 मध्येही दिसून आला होता. त्याआधी सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ आहेत. “रुको जरा सबर करो” हे त्याचं वाक्य सोशल मीडियावर अनेकांनी ऐकलं असेल. दरम्यान त्याने व्हायरल केलेल्या एका व्हीडिओत शिक्षमंत्र्यांनी माझं म्हणनं ऐकून घेतलं नाही असा आरोप विकास पाठक ऊर्फ हिंदुस्तानी भाऊने केला आहे. त्यानंतर विकास पाठक ऊर्फ हिंदुस्तानी भाऊला भेटण्यासाठी वेळ देईन असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.
दरम्यान आंदोलनानंतर विकास पाठकने म्हंटले आहे की, करोना महामारी संपत नाही तोपर्यंत परीक्षा पुढे ढकला. तुम्ही सर्व बैठका ऑनलाईन घेता, मग विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन का? हे विद्यार्थी देशाचं भविष्य आहेत. परीक्षा नको असं मी म्हणालोच नाही. फक्त ती परीक्षा पुढे ढकला. तसेच तीन महिन्यापासून विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत. मी आज सरकारला आवाहन करतोय की परीक्षा पुढे ढकला. खेडेगावात आज हजारो विद्यार्थी आहेत. त्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण घेताच आले नाही. लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना आवाहन केले होते. आता विद्यार्थ्यांनी मला आवाहन केले की आमच्यासाठी उभे राहा म्हणून मी आज त्यांच्यासाठी उभा आहे. अशी प्रतिक्रिया हिंदूस्थानी भाऊने आंदोलननंतर दिली आहे.