शिरूर – शिरुर एस टी बसस्थानक यांच्यावतीने शेतकरी, व्यापारी, कारखानदार व नागरिकांसाठी मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली असून याचा लाभ तालुक्यातील शहरातील शेतकरी ,व्यापारी ,नागरिकांनी औद्योगिक वसाहतीतील कारखानदार यांनी घ्यावा असे आव्हान शिरूर बस स्थानकाचे आगार प्रमुख महेंद्र माघाडे यांनी केले.
ही माल वाहतूक कमीत कमी दरात व प्रत्येक ग्राहकाला परवडेल अशा दरात देणार असल्याचे माघाडे यांनी सांगितले.
सध्या कोरोनाव्हायरस चा पादुर्भाव सर्वत्र असून सध्या लोक डाऊन सुरू आहे या काळात एसटी बस मोठ्या अडचणीत आली असून नुसत्या शिरूर शहरातील एसटी बस स्थानकाचे दोन महिन्याच्या या कालावधीत साडेचार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
शिरूर शहरात एसटी बस स्थानकात महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून एसटी बस येत असतात अशा एसटी बसची संख्या जवळपास साडेसातशे एवढी असून यामुळे शिरुर एसटी बस काम खास मोठा फटका बसला आहे.
यामुळे महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार एसटी बस आता मालवाहतुकीचे काम करणार असून शेतकऱ्यांचा भाजीपाला, व्यापाऱ्यांची किराणामाल, कपडे इतर वस्तूंची मालवाहतूक आता एसटी बस करणार आहे. तर शिरूर तालुक्यातील कोरेगाव-भीमा सणसवाडी रांजणगाव कोंढापुरी शिक्रापूर कारेगाव या औद्योगिक भागातील कंपन्यांची मालाची ने आण एसटी बस करणार असल्याचे शिरूर बसस्थानकाची आगार प्रमुख महेंद्र माघाडे यांनी सांगितले.
प्रत्येक ग्राहकाला परवडेल अशा कमी कमी दरामध्ये एसटी बस मालवाहतूक करणार असून यासाठी कारखानदार व्यापारी शेतकरी किराणा दुकानदार यांनी एसटी बस यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या माल वाहतूक एस सहकार्य करावे असे आवाहनही शिरूर आगार प्रमुख महेंद्र माघाडे यांनी केले आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा एकदा एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे त्यासाठी एसटी बसचे निर्जंतुकीकरण सोशल डिस्टन साठी एका सीटवर एकच प्रवासी, असलेने प्रवाशांनीही आता पुन्हा एकदा प्रवासाकरिता आपल्या एसटी बसचा मार्ग स्वीकारावा असे आवाहनही आगारप्रमुख महेंद्र माघाडे यांनी केले आहे.
सध्या शिरूर स्थानकाच्या वतीने एसटी बस सेवा सुरू केली असून प्रवाशांनी प्रवासासाठी आता पुन्हा एकदा एसटी बस चा वापर करावा सोशल डिस्टन्स ठेऊन ही बस सेवा सुरू राहणार आहे. प्रवाशांनी पुन्हा एकदा आपल्या लाल्परी सहकार्य करावे. – भाऊसाहेब कुरुंदळे एस टी वाहक शिरूर बस स्थानक