पुणे(प्रतिनिधी) – खंडणी मागण्यासाठी गाडीतून पळवून नेत असताना प्रतिकार करोन पळून जाणाऱ्यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात एकाला न्यायालयाने 50 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे. पुराव्यात ढवळाढवळ न करण्याच्या अटीवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
मोन्या ऊर्फ सतिश प्रकाश खैरे (वय 22, रा. नाझरे, ता. पुरंदर) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. श्रीकृष्ण घुगे, ऍड. सचिन जगताप आणि ऍड. दयानंद लोंढे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. याबाबत राजकुमार सुर्यवंशी (वय 40, रा. उरळी कांचन) यांनी जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना जेजुरी येथे 2 फेबुवारी येथे घडली होती.
पन्नास हजार रुपये खंडणीसाठी फिर्यादी, त्यांचा भाऊ आणि अत्या भाऊ या तिघांना पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यावेळी प्रतिकार करून ते पळून जावू लागले. त्यावेळी तिघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात अन्य सात जणांवर गुन्हा दाखल आहे. दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर खैरे याने ऍड. श्रीकृष्ण घुगे, ऍड. सचिन जगताप, ऍड. दयानंद लोंढे जामिनासाठी अर्ज केला होता.