सातारा, (प्रतिनिधी) – तंबाखू नियंत्रण कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी. युवक आणि लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करावी, अशी विनंती युवकांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना केली.
धूम्रपान निषेध दिनाबद्दल युवकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना बुधवारी निवेदन दिले. अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, छ. शिवाजी कॉलेज ऑफ आर्टस्, कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी रोहन कदम, तेजस देशमुख, सृष्टी जगताप, कार्तिकी देसाई, अथर्व कमले,
संजना चव्हाण, आदित्य सूर्यवंशी, प्राची बामणे, कुंदन शिंदे, अभिजित मनोहर, आदित्य माने, सुचेता मुळे, प्रशांत कांबळे, कैलास जाधव, संतोष पाटील, प्रणव पवार, गौरव भंडारे, शेखर वायदंडे, अंकित शिंदे उपस्थित होते.