पुणे – लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्या कोरेगाव पार्कमधील हॉटेल चालक व मालकांवर कोरेगाव पार्क पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये हॉटेल मर्फीज, हॉटेल टल्ली, हॉटेल द डेली आणी हॉटेल पब्लिक यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार लॉक डाऊनच्या नियमासंदर्भात महापालिकेने नव्याने आदेश काढले आहेत. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोरेगाव पार्कमधील नियमांचा भंग करत असलेल्या हॉटेलांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानूसार कोरेगाव पार्क मधील हॉटेलांचा तपासणी केली असता, तेथे आसन क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक असलेले आढळले. तसेच नमूद केलेल्या आदेशा प्रमाणे बाह्य दर्शनी भागात आसन क्षमता व ग्राहक संख्येची माहिती लिहली नव्हती.
हॉटेल सेवा पुरवित असताना करोना विषाणूचा संसंर्ग पसरवण्यासाठी हयगयीची कृती केल्याने हॉटेल व्यवस्थापक व मालकांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक गलांडे मॅडम, उपनिरीक्षक रुपेश चाळके यांनी पथकासह केली