देशात पुन्हा करोनाचा संसर्ग वाढला असून अनेक बॉलीवूड सेलब्सही या महामारीच्या कचाट्यात सापडत आहेत. रणबीर कपूर, संजय लीला भंसाली, मनोज वाजपेयी आणि आशीष विद्यार्थीनंतर आता बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारियाला देखील करोनाचा संसर्ग झाला आहे.
View this post on Instagram
तारा सुतारियाची कोविड-19 चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परंतु याबाबत ताराकडून अद्याप अधिकृतपणे दुजोरा देण्यात आलेला नाही. तारा सुतारियाला करोना झाल्याचे वृत्त व्हायरल झाल्याने तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास तारा सुतारियाने आपल्या आगामी “तडप’ चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण केले आहे. या चित्रपटात ती सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीसोबत झळकणार आहे. अहान शेट्टी बॉलीवूडमध्ये डेब्यू करत असल्याने “तडप’ सध्या खुपच चर्चेत आहे. हा चित्रपट लवरकच प्रदिर्शत होणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, या आठवडाभरात अनेक बॉलीवूड स्टार्स एकापाठोपाठ एक करोनाबाधित आढळून आले आहत. या आठवडयाच्या सुरुवातीला डायरेक्टर संजय लीला भंसाली हे करोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर रणबीर कपूर, मनोज वाजपेयी आणि आशीष विद्यार्थी यांना देखील करोनाचा संसर्ग झाला होता.
View this post on Instagram