मुंबई – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी अटक केली होती. कोठडीत असलेले सचिन वाझे यांची सध्या एनआयएकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान, सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे.
Police officer Sachin Waze placed under suspension by an order of Addl CP Special Branch: Mumbai Police PRO, S Chaitanya to ANI
He was arrested by NIA in connection with its investigation into the recovery of explosives from a car parked near Mukesh Ambani’s house in Mumbai. pic.twitter.com/ent3Il45bA
— ANI (@ANI) March 15, 2021
मुंबईत स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी या वाहनाचे मालक मनसूख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाला. यानंतर सचिन वाझे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
दरम्यान, अंबानींच्या निवासस्थानाबहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवणाऱ्या स्कॉर्पिओ पाठोपाठ आलेली पांढरी इनोव्हा मोटार शनिवारी एनआयएने जप्त केली. ही मोटार मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्याची असल्याचे बोलले जाते. स्कॉर्पिओ पाठोपाठ आलेल्या इनोव्हा मोटारीचा तपास 25 फेब्रुवारीपासूनचे सीसीटीव्ही फुटेज पाहून करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्कॉर्पिओ गाडी अंबानी यांच्या घराजवळ पार्क करताना एक व्यक्ती पीपीई किटमध्ये दिसत असल्याचे एनआयएने सांगितले आहे. त्या व्यक्तीचा शोध घेण्यास एनआयएने सुरूवात केली आहे. जिलेटीन असलेली गाडी पार्क करण्यात आली, त्यावेळी वाझे घटनास्थळी उपस्थित होते का? पीपीई किटमध्ये वाझे होते की दुसरी व्यक्ती होती? या प्रश्नांच्या अनुषंगाने एनआयएने तपास सुरू केला आहे.