मुंबई – अत्यवस्थ करोनाबाधित रुग्णांसाठी अत्यावश्यक मानल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी केल्या जात आहे . परंतु कोणावरही कारवाई झाली नव्हती. तसेच राज्यात रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
या मुद्यावरून रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवा. तसेच यात तातडीने हस्तक्षेप करून गरीब रुग्णांना खासगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध मो
फत उपलब्ध करून द्यावं, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबळींचीही संख्या वाढत आहे. अशा वेळी रेमडेसिवीर हे उपचारातील एक महत्वाचं औषध आहे. त्यामुळे त्याचा पुरवठा सुरळीत राहील, हे सुनिश्चित करणं आवश्यक आहे, असं फडणवीस म्हणालेत.
दरम्यान,अमेरिकेत कोरोना विषाणूंवर प्रभावी औषध सापडल्याचा दावा संशोधकाने केला. अमेरिकन संशोधकांनी कोरोना विषाणूंवर ‘रेमडेसिवीर’ औषध प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार असणाऱ्या डॉक्टर अँथोनी फॉउसी यांनी यासंदर्भात माहिती दिली. कोरोनाग्रस्त रुग्णांवर रेमडेसिवीर वापल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आल्याचे ते म्हणाले होते.