अफवा पसरवणे थांबवा- शिल्पा शेट्टी

अलिकडच्या काळात डॉक्‍टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यावर शिल्पा शेट्टीने संताप आणि नाराजी व्यक्‍त केली आहे. डॉक्‍टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी जितके काम केले आहे, त्याची जाण ठेवावी आणि खोट्या, दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवू नये असे आवाहन शिल्पा शेट्टीने केले आहे. या “फ्रंट लाईन वर्क्‍स’च्या कामाची जाण ठेवावी. डॉक्‍टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी निस्वार्थवृत्तीने जे काम केले आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी सगळ्यांनी काही मिनिटांचा वेळ काढावा. या सर्वांना कोणताही त्रास होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. त्यांच्यावर हल्ले करू नये, असे तिने इन्स्टाग्रामवरच्या व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटले आहे.

मानवतावादी दृष्टीकोनातून सध्या आपण एवढेच करू शकतो. डॉक्‍टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करू शकतो. त्यांना धन्यवाद देऊ शकतो. त्यांच्या कामाचे कौतुक करू शकतो. कारण आपण सुरक्षित रहावे यासाठी हे लोक त्यांचा जीव धोक्‍यात घालत आहेत, असे शिल्पाने म्हटले आहे. शिल्पाच्या आगोदर रविना टंडननेही अफवा पसरवू नयेत आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करू नयेत, असे आवाहन सोशल मिडीयावरून केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.