पुणे: हॉटफुट युवा साखळी आंतर अकादमी फाईव्ह-अ-साईड फुटबॉल स्पर्धेच्या 10 आणि 12 वर्षाखालील गटात स्टेप ओव्हर फुटबॉल अकादमी, 4 लायन्स् अकादमी आणि नाझ फुटबॉल अकादमी अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून विजयांची हॅट्ट्रिक नोंदविली.
या स्पर्धेच्या 10 वर्षाखालील गटात स्टेप ओव्हरने हॅट्ट्रिक साकार केली. स्टेप ओव्हरने दिएगो एफसी अ संघांचा 12-0; इएनएनएस बोर्डींग संघाचा 3-1 आणि फन फिटनेस संघाचा 5-3 असा पराभव केला.
याच गटात नाझने अमत सेतू संघाचा 8-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात नाझने मेगा प्रो संघाचा 5-0 असा सहज पराभव केला. या गटाच्या इतर सामन्यात फन फिटनेस, हॉटफुट, स्कूल ऑल फुटबॉल आणि 4 लायन्स अकादमी संघांनी विजय मिळवले.
12 वर्षाखालील गटाच्या सामन्यात 4 लायन्सने सलग दोन विजयांची नोंद केली. पहिल्या सामन्यात 4 लायन्सने कमांडोजचा 7-0 असा तर, नाझचा 5-0 असा धुव्वा उडविला. याच गटात स्टेप ओव्हरने स्टारचा 10-0; दिएगो ज्युनिअर्स एफसी अ संघाचा 10-0 आणि स्कूल ऑफ फुटबॉल अ संघाचा 10-0 अशा सारख्याच गोल फरकाने
पराभव केला.