हडपसर : ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून पुणे महानगरपालिकेत आगामी महापौर राष्ट्रवादीचा असेल, असे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महंमदवाडी येथे बोलताना केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस, संजय गांधी योजनेचे जिल्हा सदस्य कलेश्वरभाऊ घुले यांनी लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मेळावा,खेळ मांडला पैठणीचा,
महिलांना साडीवाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक या नात्याने मंत्री दत्तात्रय भरणे हे बोलत होते.
यावेळी आमदार चेतन तुपे पाटील,माजी आमदार रमेश अप्पा थोरात,पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप,युवक शहर महेश हांडे, अध्यक्ष माजी महापौर वैशाली बनकर,उद्योगपती बाळासाहेबतात्या भानगिरे,माजी उपसभापती सचिन शेठ घुले,नगरसेविका नंदा लोणकर, माजी नगरसेवक फारूक इनामदार,सुनील बनकर,शहर उपाध्यक्ष निवृत्ती बांदल,साधना बँकेचे अध्यक्ष सुरेश कुशाबा घुले, राष्ट्रवादीच्या शहर महिला उपाध्यक्ष शालिनी जगताप, शीतल शिंदे,सरपंच लक्ष्मण बांदल, धनगर समाज युवक संघाचे अध्यक्ष घनश्याम बापू हाक्के,
राष्ट्रवादीचे हडपसर अध्यक्ष डॉ शंतनू जगदाळे, उद्योगपती प्रविनशेठ तरवडे,बाळामामा भानगिरे,भगवानअप्पा चव्हाण, नारायण डांगे, स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे,सागर राजे भोसले,उमेश कोंढाळकर, दीपाली कवडे, वैष्णवी सातव, महेश सातव,गणेश बोराटे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते आणि हजारो महिला उपस्थित होत्या.
स्वतःच्या कुटुंबापेक्षा समाजाची जास्त काळजी केली, पराभवाने खचून गेलो नाही,पक्षनिष्ट राहून काम करत राहिलो, प्रभाग 26 च्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेऊन 2022 च्या मनपा निवडणुकीत बाजी मारणार असा विश्वास आयोजक कलेश्वरभाऊ घुले यांनी यावेळी व्यक्त केला.
किरण पाटील यांच्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचा आनंद यावेळी महिलांनी लुटला.
50 भाग्यवान लकी ड्रॉ विजेत्या महिलांना यावेळी बक्षिसे देण्यात आली तर खेळ पैठणीचा या स्पर्धेतील महिलांना टीव्ही,वॉशिंग मशीन,फ्रीज,कुलर आदी बक्षिसे यावेळी देण्यात आली.तर कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रत्येक महिलेस यावेळी साडी देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जीवन घुले,कुणाल घुले,मिथुन घुले,लखन काळे,राजेंद्र नाना घुले,राजेंद्र बापू घुले,दत्तात्रय ज्ञानोबा घुले,भगवान मामा भानगिरे आदींनी परिश्रम घेतले.