Onion Export Ban – केंद्र सरकारने लागू केलेली कांदा निर्यात बंदी पूर्णपणे मागे घेतली नसून या बंदीच्या निषेधार्थ किसान सभेने सोमवारपासून आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला सरकारने १ मार्चपर्यत सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास मुंबईपर्यत लॉंग मार्च काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
किसान सभा आणि माकपकडून विविध मागण्यांसाठी एल्गार पुकारला आहे. यामध्ये वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, कांदा निर्यात सर्व देशात खुली करावी आदी प्रमुख मागण्या आहेत. तसेच इतरही मागण्या आहेत. । Onion Export Ban
दरम्यान, राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये मंगळवारी मुंबईत झालेली चर्चा निष्फळ ठरली होती. आक्रमक आंदोलकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाची कोंडी केली. तीन दिवसांपासून अधिकारीवर्गाला आपली वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नेता आलेली नाहीत.
राज्य सरकारने प्रतिसाद दिला नाही, तर जेल भरो आंदोलन, उपोषण किंवा मुबंईपर्यत लाँग मार्च काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत सरकारकडून कोणताही संवाद झालेला नाही. । Onion Export Ban
विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असल्याने त्यांना त्रास होईल असं कोणी वर्तन करणार नाही अशा सूचना केल्या आहेत, कलेक्टर ऑफिस, न्यायालय यांना देखील आंदोलनाचा त्रास होणार नाही ही आमची भूमिका असल्याचे किसान सभेकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा माजी आमदार जे पी गावित यांनी दिला आहे. अनेक वर्षांपासून त्याच मागण्या केल्या जात आहेत, मागील वर्षी मुबंईच्या दिशेने मोर्चा काढला होता, शहापूरजवळ मोर्चा थांबला, तिथे सरकारने आश्वासन दिले.
मात्र, ते देखील पाळले नाही, त्यामुळे आता जोपर्यंत अंमलबजावणी केली जात नाही तोपर्यत मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. । Onion Export Ban