पुणे – राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागात चालक व वाहक पदासाठीची सरळसेवा भरती प्रलंबित आहे. पण, ती पूर्ण करण्यास प्रशासन तयार नाही, असा आरोप करत युवक कॉंग्रेसने आंदोलन केले.
एसटी महामंडळाने सन 2019 मध्ये राज्यातील बारा विभागांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली. मात्र, पुणे विभागात वैद्यकीय चाचणी होऊनही ट्रायल न झाली नाही. तसेच ट्रायल ट्रॅक नसल्याने त्यांची भरती प्रक्रिया चार वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे ट्रायल लवकरात लवकर घेऊन ही भरती प्रक्रिया सुरू करावी. पुणे विभागाची अंतिम निवड यादी जाहीर करावी, प्रशिक्षण काळात बसेसची संख्या वाढवावी आदी मागण्या युवक कॉंग्रेसने मांडल्या आहेत.
यावेळी एसटीचे प्रभारी विभागीय नियंत्रक कैलास पाटील यांना पुणे शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल सिरसाठ यांच्या उपस्थितीत मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश प्रभारी एहसान अहमद खान, प्रवक्ते हनुमंत पवार, विजयसिंह चौधरी, प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, प्रदेश सचिव राजू ठोंबरे, संतोष पाटोळे, वाहिद नीलगर, अक्षय माने, केतन जाधव, प्रसाद वाघमारे, अजित ढोकळे, मुरली बुद्धाराम, विकार शेख, रमेश कांबळे यांसह वैद्यकीय चाचणी झालेले उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.