बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातील मुरलीगंज दुर्गास्थान मंदिर परिसरात बुधवारी रात्री अष्टयम दरम्यान भगवान शिवाची वेशभूषा केलेल्या एका व्यक्तीला विषारी सापाने दंश केला. यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृताचे वय अवघे ३० वर्षे होते. या घटनेनंतर मृत तरुणाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, अष्टमाला मुरलीगंज दुर्गा मंदिर परिसरात कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी बाबा भोलेनाथ बनलेल्या तरुणाच्या गळ्यात विषारी साप लटकला होता. कार्यक्रमात भजन-कीर्तन सुरू होते तसेच नृत्य समूह नाचत होते. दरम्यान, शिवा झालेल्या 30 वर्षीय मुकेश कुमारला साप चावला.
मुकेशच्या मृत्यूने घाबरलेल्या भजन मंडळींनी पुन्हा मुरलीगंज येथील सामुदायिक आरोग्य केंद्र गाठले आणि त्याचा मृतदेह तेथेच टाकून पळ काढला. मुकेशची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला मधेपुरा मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले, मात्र वाटेतच मुकेशचा मृत्यू झाला.
या प्रकरणाची माहिती देताना अंडर इन्स्पेक्टर पीसी पासवान यांनी सांगितले की, ‘मृत्यू झालेला तरुण कुमारखंड पोलीस स्टेशन हद्दीतील खुर्दा गावचा रहिवासी होता, आणि तो भजन मंडळीमध्ये काम करीत होता. साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला. भजन मंडळींतील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या भजन मंडळींचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.’