कोरेगाव भीमा – बोलो साईराम, जय जय साईराम या नामघोषात कोरेगाव भीमा येथे पुणे येथील साई बाबांच्या पालखीचे आगमन झाले. बाबांच्या नामघोषात भक्तिमय वातावरणात परिसर न्हाऊन निघाला होता.
शिर्डी माझे पंढरपूर मानणारे साईभक्त सकाळी पुण्याहून नगर रोडच्या दिशेने निघाले. बाबांच्या पालखीसमवेत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचे आणि पालखीचे साई भक्तांनी जोरदार स्वागत केले. यावेळी सरपंच विक्रम गव्हाणे, महेश गव्हाणे, नितीन गव्हाणे, साईभक्त प्रशांत फडतरे, ज्ञानेश्वर फडतरे, अक्षय फडतरे, कुणाल परिहार, राजेंद्र गव्हाणे, साईभक्त उपस्थित होते.
1989 मध्ये साईभक्तांनी हा पालखी सोहळा सुरू केला. श्री साईबाबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष गुरुप्रसाद पगडे यांच्या नेतृत्वाखाली पालखीने पुणे येथून उत्साहात प्रस्थान ठेवले. आकर्षक फुलांनी सजवलेला साईबाबांचा रथ लक्ष वेधून घेत होता. पुणे, अमरावती, रत्नागिरी, यवतमाळ जिल्ह्याबरोबरच कर्नाटक येथील साईभक्त सहभागी झाले आहेत.