मुंबई – अखेर प्रतीक्षा संपली असून बारावी पाठोपाठ आता SSC अर्थात इयत्ता दहावीचा निकाल देखील जाहीर होणार आहे. दहावीचा निकाल उद्या म्हणजेच 2 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे.
यंदा तब्बल 16 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. ही परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडली होती. राज्यभरातील 5 हजार 33 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती होती.
दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकत विद्यार्थ्यांना होती. अखेर हा सस्पेन्स संपला असून आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे. 2 जूनला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. दरम्यान, तुम्हाला हा निकाल कुठं आणि कसा पाहता येणार याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे…
निकाल कुठे चेक कराल?
mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
ssc.mahresults.org.in
असा करा निकाल चेक –
इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी शिक्षण विभागाच्या mahresult.nic.in या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या.
त्यानंतर संकेतस्थळाच्या होमपेजवर Maharashtra Examination 2023 – RESULT च्या लिंकवर क्लिक करा
त्यानंतर SSC Examination February- 2023 RESULT लिंकवर क्लिक करा
त्यानंतर पुढच्या पानावर Roll Number आणि आईचं नाव टाका
निकाल लगेच स्क्रिनवर दिसेल
मार्कशीट चेक केल्यानंतर प्रिंट घ्या