नवी दिल्ली – अनेक महिला आपले सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मेकअप पद्धतीचा वापर करत असतात. लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम अश्या विविध कार्यक्रमांमध्ये महिला मेकअप मध्ये दिसून येतात.
परंतु अनेक वेळा अति मेकअप मुळे या महिला स्वतःलाही ओळखू शकत नाही. अश्याच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अतिमेकअप मुळे एका मुलाला स्वतःच्या आईच ओळखू आली नाहीये.
View this post on Instagram
नेमक काय आहे व्हिडीओमध्ये ?
एक महिला मेकअप करून आपल्या मुलासमोर येऊन उभी राहिली. आई समोर येताच मुलगा मोठ्याने रडू लागला आणि माझी आई कुठे आहे? असा प्रश्न विचारू लागला आहे. त्याची आई ‘मीच तुझी आई आहे….’ असे म्हणत मुलाची समजूत काढत आहे पण तो मुलगा काही ऐकायला तयार नाही.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कॉमेंट्स देखील केल्या आहेत.