श्रीरामपूर, संगमनेर परिसरातून सव्वातीन लाखांची दारू जप्त

नगर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर श्रीरामपूर व संगमनेर परिसरात बुधवारी सकाळी सापळा रचून ठिकठिकानी सिनेस्टाईलने पाठलाग करून एक टाटा एस, एक टाटा इंडिका व एक ऍक्‍टिव्हा स्कूटरधून अवैध दारू पकडण्यात आला आहे. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 3 लाख 34 हजार 980 किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे.

लोकसभा निडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने बुधवारी रोजी सकाळी अकरा वाजता विभागीय उपायुक्त (पुणे विभाग) नगर येथील अर्जुन ओव्हाळ व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर येथील प्र. निरीक्षक एस. आर. कुसळे, दुय्यम निरीक्षक पी. बी. अहिरराव, के. यू. छत्रे, एस. बी. भगत, ए. एस. धोका, ए. ए. लिचडे, आर. बी. कमद, प्रवीण साळवे, बी. ए. चत्तर, व्ही. ए. पाटोळे यांच्या पथकाने कारवाई केली. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारू व पैसे वाहतूक करणाऱ्या विरोधात प्रशासानाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात 36 पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकाने आतापर्यंत अनेक ठिकाणी कारवाई केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.