व्हॉटसऍप स्टेट्‌स ठेवण्यावरून मुलांनंतर पालकांचीही हाणामारी

पुणे – व्हॉटसऍप स्टेट्‌स ठेवण्यावरून झालेल्या वादातून मुलांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. दरम्यान, हा प्रकार दोन्ही मुलांच्या पालकांना समजल्यानंतर पोलीस चौकीसमोर तक्रार देण्याच्या रागातून दोन्ही मुलांचे कुटुंबिय एकमेकांना भीडले. मारामारीमध्ये दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले आहेत. नाना पेठेत बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी परस्परविरोधात दिलेल्या तक्रारीवरून समर्थ पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यात बुधवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास त्याचे दोन मुले ज्युस आणण्यासाठी नाना पेठ, भाजी मंडई परिसरात गेली होती. त्यावेळी सिग्नल लागल्याने ते रस्त्यावर उभी असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या एकाने व्हॉटसऍपवर “फहिम…समझा क्‍या रे।’ हे स्टेट्‌स टाकल्याच्या कारणावरून वाद उकरून काढला आणि त्याच्यासोबत असलेल्या साथीदारांनी मिळून फिर्यादींच्या दोन्ही मुलांना बेल्ट आणि लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. याबाबत नाना पेठ चौकी येथे फिर्यादींनी तक्रार दाखल केली. याप्रकरणी सात जणांविरोधात समर्थ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास पोलीस हवालदार एन. व्ही. धोत्रे करीत आहेत. तसेच 46 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर, इतर दोन अल्पवयीन आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिकलगार हे करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.