सातारा: सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी भाजपचे उमेदवार माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या पराभव केला. उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक पार पडली.
शरद पवारांना दगा दिल्याने उद्यनराजेंचा पराभव झाला, अशी प्रतिक्रिया श्रीनिवास पाटील यांनी दिली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
उदयनराजे भोसले यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा येथे जाहीर सभा घेतली होती. साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक ही भाजपाने प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का आहे.