कोलंबो – श्रीलंकेचे राज्यमंत्री सनथ निशांत आणि त्यांच्या सुरक्षा दलातील एका हवालदाराचा गुरुवारी सकाळी महामार्गावर कार अपघातात मृत्यू झाला. श्रीलंका पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 48 वर्षीय पाणीपुरवठा राज्यमंत्री ज्या एसयूव्हीमध्ये प्रवास करत होते ती बुधवारी पहाटे 2 वाजता कोलंबोला जाणाऱ्या मालवाहू कंटेनर ट्रकच्या मागील बाजूस आदळली आणि अपघात झाला.
यूज फर्स्ट लंका यांनी पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, वाहन चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला रागामा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कटुनायके एक्स्प्रेस वेवर घडलेल्या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. निशांत हे 2015 पासून पुट्टलमचे खासदार होते.