पहिल्या टप्प्यात 17 निरोगी व्यक्तींना दिले डोस
पुणे – करोना प्रतिबंधासाठी रशियाने तयार केलेल्या “स्पुटनिक व्ही’ लसीची पुण्यातील नोबेल हॉस्पिटलमध्ये चाचणी सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 17 निरोगी व्यक्तींना हा डोस देण्यात आला आहे. लस दिलेल्या व्यक्तींना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, असे नोबेल हॉस्पिटलमधील संशोधन विभाग प्रमुख डॉ. एस. के. राऊत यांनी सांगितले आहे.
रशियातील गॅमलिया नॅशनल रिसर्च सेंटरच्या संशोधकांनी “स्पुटनिक व्ही’ लस विकसित केली असून भारताने 10 कोटी डोस विकत घेण्याचे ठरवल्याचे वृत्त आहे. ज्यांना लस द्यायची आहे त्यांची निवड निकषांनुसार करण्यात आली आहे.
या व्यक्तींना ऑनलाइन फॉर्मही उपलब्ध करुन दिलेला आहे. लस देईपर्यंत ती उणे 20 अंश सेल्सियस तापमानाखाली ठेवण्यात आली होती. पुण्यात चाचणी होत असलेली ही दुसरी लस आहे.