शिक्रापूर -शिरूर तालुक्यातील काही गावांमध्ये एक पट्टेरी वाघीण आपल्या तीन बछड्यांसह फिरत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित होत आहे. तो व्हिडिओ आपल्या भागातील नसून नागरिकांनी अफवा न पसरविता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी केले आहे.
तालुक्यात काही ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्या आहेत, मात्र वाघ नाहीत, विदर्भातील एका वाघिणीचा तीन बछड्यांसह फिरतानाचा व्हिडीओ सध्या शिरूर तालुक्यात सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. वाघीण आणि तिचे बछडे असल्याची अफवा पसरवली जात आहे. आठवड्यात तालुक्यात दोन गावांमध्ये अफवेचा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या दोन युवकांना शिरूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शोधून काढत त्यांना समजदेखील दिली आहे,