पुणे – पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जिम्नॅस्टिक स्पर्धेत पुण्याच्या गणेश नवले यांने ब्रॉंझपदक पटकावले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणारा गणेश जिम्नॅस्टिकमध्ये पदक जिंकणारा पुण्याचा एकमेव खेळाडू ठरला आहे. पंजाबमधील अमृतसर येथे 13 ते 16 मार्चच्या दरम्यान झालेल्या आंतरविद्यापीठ जिम्नॅस्टिक स्पर्धेत पुणे विद्यापाठातील सहा खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये टेबलव्हॉल्ट प्रकारात गणेशने चमकदार कामगिरी करत ब्रॉंझपदकाची कमाई केली.
स्पर्धेत देशभरातील 72 विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. जिम्नॅस्टिकमधील प्यारलल बीम प्रकारातही त्याला पदकाची संधी होती. मात्र तांत्रिक गुणांनी त्याला अपयशाला सामोरे जावे लागले. त्यानंतर टेबलव्हॉल्ट प्रकारात त्याने 10.7 गुणांची कमाई करत ब्रॉंझपदक मिळविले. यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही गणेशने सुवर्णपदक पटकावले होते. म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या क्रीडाप्रबोधनीत प्रशिक्षक प्रवीण ढगे व योगेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश सराव करतो.