महाभारताचे युद्ध 18 दिवसांत जिंकले, कोरोनासोबत 21 दिवस चालले युद्ध- पंतप्रधान

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना विषाणूबाबत 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. यानंतर बुधवारी त्यांनी आपल्या मतदारसंघात वाराणसीच्या लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आपल्या भाषणाच्या सुरूवातीस पंतप्रधान म्हणाले की, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई शैलपुत्रीची पूजा केली जाते, तिला निसर्गदेवी देखील म्हटले जाते. देश आज ज्या संकटातून चालत आहे त्या परिस्थितीत आपल्याला त्यांचे आशीर्वाद हवे आहेत. माझी आई, शैलपुत्री, अशी इच्छा आहे की देशाने कोरोना साथीच्या रोगाविरूद्ध लढाई जिंकावी.

ते म्हणाले, ‘काशीचा खासदार म्हणून मला अशावेळी तुमच्याबरोबर असायला हवे होते. परंतु येथे दिल्लीत काय चालले आहे याची आपल्याला माहिती आहे. तरीदेखील मी काशीचे अपडेट घेत आहे. आठवा की महाभारताचा युद्ध १८ दिवसांत जिकंले होते, कोरोना विरूद्ध जे युद्ध आपण लढत आहोत त्याला २१ दिवस लागतील. महाभारताच्या युद्धाच्या वेळी कृष्ण सारथी होते, आज आपण १३० करोड सारथींच्या जोरावर हे युद्ध जिंकू.

कोरोना विरूद्धच्या युद्धात काशीची महत्वाची भूमिका

पंतप्रधान मोदी म्हणाले की कोरोनाविरूद्धच्या या युद्धात काशीच्या लोकांची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. लॉकडाउनच्या वेळी काशी देशातील जनतेला संयम, समन्वय आणि सहिष्णुता शिकवू शकते. काशी म्हणजे केवळ कल्याण. जर महादेवच्या शहरामध्ये ही क्षमता नसेल तर ती कोणाकडे असेल. कोरोना साथीच्या संदर्भात देशात व्यापक तयारी सुरू आहे, परंतु घरांमध्ये बंद राहणे हा एकच उपाय आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.