पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पीवायसी अ संघाने सोलारिस गो गेटर्सचा 24-04 असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत डॉ. जमेनीस, केदार शहा, केतन धुमाळ, सत्यमूर्ती, प्रशांत सुतार, जयंत कढे, ऋतू कुलकर्णी, अभिषेक ताम्हाणे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी अ संघाने सोलारिस गो गेटर्सचा 24-04 असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली.