नवी दिल्ली – विवरण भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्यामुळे विवरण सादर करणाऱ्यांची संख्या वाढली असून आतापर्यंत चार कोटी करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र सादर केले असल्याची माहिती प्रत्यक्ष कर मंडळाने दिली.
विवरण सादर करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. 21 डिसेंबर रोजी 8.7 लाख करदात्यांनी सरलेल्या वर्षासाठीचे विवरण सादर केले. तर गेल्या सात दिवसांमध्ये विवरण सादर केलेल्या करदात्यांची संख्या 46.77 लाख इतकी आहे.
शेवटच्या तारखेपुर्वी विवरण भरावे अशी सूचना कर विभागाने प्राप्ती करदात्यांना एसएमएस आणि ई-मेल च्या माध्यमातून केली आहे. विवरण सादर करण्याचे पोर्टल सध्या व्यवस्थित काम करीत आहे. या पोर्टल मध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे गेल्या काही महिन्यात विवरण सादर करण्यावर परिणाम झाला होता.