नवी दिल्ली – कॉंग्रेस पाठोपाठ आता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियालाही आयकर विभागाकडून नोटीस प्राप्त झाली आहे, ज्यामध्ये कर रिटर्न भरताना जुने पॅन कार्ड वापरल्याबद्दल त्यांना ११ कोटी रुपयांचे “देय” भरण्यास सांगितले आहे.
जुने पॅन कार्ड वापरल्याच्या कारणावरून इतका मोठा दंड करण्यात आल्याचे हे एकमेव उदाहरण असावे. कर अधिकाऱ्यांच्या नोटीसला आव्हान देण्यासाठी डावे पक्ष आपल्या वकिलांचा सल्ला घेत असल्याची माहिती या पक्षांकडून देण्यात आली आहे.
यापूर्वी, काँग्रेसने सांगितले की त्यांना आयटी नोटिसा मिळाल्या आहेत, ज्यात पक्षाला मागील वर्षांच्या कर रिटर्नमधील विसंगतींसाठी १९२३ कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी भरण्यास सांगितले आहे.
तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांनीही दावा केला आहे की त्यांना गेल्या ७२ तासांत ११ आयटी नोटिसा मिळाल्या आहेत.विरोधकांवर कर दहशतवाद वापरात आणला जात असल्याचा आरोप कॉंग्रेस व अन्य विरोधकांकडून करण्यात येत आहे.