सुशील कुमारसाठी विशेष सुरक्षा यंत्रणा

नवी दिल्ली |  युवा कुस्तीपटू सागर धनखड याच्या हत्येच्या आरोपात अटकेत असलेल्या सुशील कुमारच्या जीवाला तुरुंगामध्ये धोका असल्याने सीआरपीएफसह तामिळनाडूच्या विशेष पोलिसांनाही त्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे.

सुशील कुमारला मंडोली येथे तुरुंगात ठेवण्यात आले असून त्याला तुरुंगातच असलेल्या काही गुन्हेगारांकडून धोका असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यामुळे त्याला ही अतिरीक्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

तुरुंगांमध्ये सीआरपीएफची सुरक्षा यंत्रणा असतानाच विशेष पोलीस दलाचीही सुरक्षा तैनात केली गेली आहे. त्याला 15 क्रमांकाच्या रुममध्ये ठेवण्यात आले असून तीथे सीसीटीव्ही कॅमेरीह बसवण्यात आले आहेत. त्याच्यावर हल्ला झाला तर लगेच समजावे यासाठी ही यंत्रणा उभी करण्यात आली आहे. सुशील कुमारला कुख्यात गुन्हेगार काला जठेडी आणि लॉरेन्स बिश्‍नोई यांच्याकडून धमक्‍याही आल्या होत्या.

सुशील कुमारला येथे आणण्यात येण्यापूर्वीच लॉरेन्स बिश्‍नोईही याच तुरुंगात आला होता. पण आता त्याला दुसऱ्या तुरुंगातून हलवण्यात आले आहे. दरम्यान सुशील कुमारच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली आहे. कारण सुशील कुमारने सागर आणि त्याच्या मित्रांचे अपहरण केल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. त्यामुळे सुशील कुमारची अडचण आणखीनच वाढणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.