FIFA World Cup Qualifiers | भारतीय फुटबॉल संघाची निराशा

नवी दिल्ली – फिफा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतून भारतीय संघ बाद झाला आहे. अत्यंत निराशाजनक कामगिरी केल्यामुळे संघ मुख्य स्पर्धेत पात्र ठरण्याचे स्वप्न यंदाही पूर्ण झाले नाही.

 भारताचा अव्वल खेळाडू सुनील छेत्री याने स्टार खेळाडू लिअनेल मेस्सीच्या गोलसंख्येला पार करत अफलातून कामगिरी केली मात्र, अन्य खेळाडूंच्या सुमार कामगिरीचा भारतीय संघाला फटका बसला. 

छेत्रीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताला 2-0 असा विजय मिळवून दिला होता. मात्र, त्यानंतर उर्वरीत सामन्यांत भारतीय संघाच्या हाती यश लागले नाही. या स्पर्धेत भारतीय संघाला तीन पराभव पत्करावे लागले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.