रोसियू/नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चौकसीला भारतात आणण्याच्या आशा वाढल्या आहेत.
अँटीगुआचे पंतप्रधान गैस्टन ब्राउन यांनी सांगितल्यानुसार, भारताने एका खासगी विमानाद्वारे डोमिनिका सरकारला चौकसीच्या हस्तांतरणाचे डॉक्युमेंट पाठवले आहे. चौकसी सध्या डोमिनिकातील तुरुंगात कैद आहे. दरम्यान, चौकसीबाबत भारत सरकारकडून अद्याप कुठलेही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
नुकतंच 14 हजार कोटींच्या पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चौकसीचा डोमिनिकाच्या तुरुंगातून पहिला फोटो समोर आला. त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसत आहे. विशेष म्हणजे, चौकसीच्या डोळ्याला आणि हाताला दुखापत झालेली दिसत आहे.
डोमेनिकामध्ये चौकसीचे वकील मार्श वेनने म्हटले की, त्याने चौकशीची तुरुंगात भेट घेतली होती. चौकसीने डोमिनिकामध्ये अपहरण करुन आणल्याचा आणि मारहाणीचा आरोप लावला आहे. याप्रकरणी चौकसीचा वकील याचिका दाखल करणार आहे.