रोसेउ (डॉमनिका) – फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याने केलेल्या दाव्यानुसार चोक्सीचे अँटिग्वातून अपहरण करण्यामध्ये आपले सरकार सहभागी असल्याचे दावा डॉमनिकाचे पंतप्रधान रुजवेल्ट स्केरिट यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे.
चोक्सीबाबतची कायदेशीर प्रक्रिया न्यायालयाने सुरू ठेवावी आणि चोक्सीचे कायदेशीर अधिकार जपले जातील, असेही स्केरिट यांनी म्हटले आहे. डॉमनिक वृत्तसंस्थेच्या हवाल्याने अँटिग्वाच्या प्रसिद्धी माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
भारत आणि डॉमनिक सरकारांनी मिळून चोक्सीचे अँटिग्वातून अपहरण करण्याचे कारस्थान केले असल्याचा दोवाही स्केरिट यांनी फेटाळून लावला आहे. चोक्सी 2018 मध्ये भारतातून पलायन केल्यानंतर पासून अँटिग्वामध्येच तेथील नागरिक म्हणून राहात आहे.
डॉमनिकामध्ये गेल्यावर त्याने भारत-डॉमनिकाने संगनमत करून आपले अपहरण घडवून आणल्याचे दावा केला होता. मात्र अशा कोणत्याही कृत्यामध्ये आपला देश सहभागी असल्याचा दावा स्केरिट यांनी फेटाळला आहे.