मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटच्या माध्यमातून एनसीबीचे संचालक समीर वानखेडे आणि भाजप यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, आज सकाळीच एक ट्विट पोस्ट करून त्यांनी कोणावर तरी निशाणा साधणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पून्हा एकदा एक सूचक ट्वीट करत मलिकांनी उत्सुकता वाढवली आहे.
नवाब मलिकांनी आज ट्वीट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एवढंच नव्हे तर त्यांनी एका नव्या खुलाशाचा सूचक इशाराही या ट्वीटमधून दिला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, “शुभ दीपावली. तुम्हा सर्वांची दिवाळी मंगलमय होवो. हॉटेल ललितमध्ये अनेक रहस्य लपलेली आहेत. तेव्हा भेटूया रविवारी”.
शुभ दीपावली
आप सभी की दिवाली मंगलमय होहोटल ‘The Lalit’ मे छुपे है कई राज़…
मिलते है रविवार को— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2021
त्यांच्या या ट्वीटची आता चांगलीच चर्चा रंगत आहे. रविवारी कोणता नवा खुलासा नवाब मलिक करणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. दरम्यान राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज आणखी एक ट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे”
बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी
लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2021
नवाब मलिक यांनी हे ट्वीट केल्यानंतर काही वेळातच यावर प्रतिक्रियांचा पाऊस आलाय. तसेच अनेकजण हे ट्वीट लाईक आणि रिट्वीट देखील करत आहे. या ट्वीटवर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये जशा नवाब मलिक यांच्या कौतुकाच्या प्रतिक्रिया आहेत तशाच त्यांच्यावर टीका करणाऱ्या देखील आहेत.दरम्यान, नवाब मलिक यांनी आपल्या आधीच्या पत्रकार परिषदांमध्ये बोलताना भाजपच्या अनेक नेत्यांचा खरा चेहरा समोर आणणार असल्याचा इशारा दिलाय. यात त्यांनी प्रतिक गाबापासून अनेकांचा उल्लेख केलाय. तसेच आगामी विधानसभा अधिवेशनात सदनाच्या पटलावर या सर्वांवरील आरोपांबाबतचे पुरावे ठेवणार असल्याचं म्हटलंय.