पुणे – सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना यांचे लीड रोल असलेला “अंतिम’ याच महिन्यात 25 तारखेला रिलीज होणार आहे. सलमान खान एका शीख पोलीस अधिकाऱ्याच्या रोलमध्ये दिसणार आहे.
“अंतिम’मध्ये आयुष शर्मा बरोबर महिमा मकवाना ही हिरोईन असणार आहे. मात्र सलमान खानबरोबर कोणीही हिरोईन असणार नाही. सलमानबरोबर कोणीही हिरोईन नसणे असे फारच कमी वेळा होते.
या सिनेमात त्याच्याबरोबर कोणीही हिरोईन का नाही, याचे कारणही सलमानने दिले आहे. “अंतिम’मधील रोल मूळातच इतका भारी रोल आहे की त्याला हिरोईनच्या जोडीची आवश्यकताही नाही.
जर हिरोईन असती आणि अन्य हिरो-हिरोईनप्रमाणे रोमान्स आणि नाचगाणे यामध्ये घुसवले असते, तर या रोलचे गांभीर्यच निघून गेले असते. हा रोल आपल्या नियोजित उद्दिष्टापासून भटकला असता.
अशाप्रकारे ही व्यक्तिरेखा भटकायला नको, असे आम्हाला वाटत होते. हिरोईनला गृहित धरून थोडे शूटिंग देखील झाले होते. मात्र नंतर तो भाग काढून टाकला गेला, असे सलमान म्हणाला. “अंतिम’ हा मराठीत गाजलेल्या “मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.