कोलकता – करोनाव्हायरसमुळे जगभर कोव्हिड19 चा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून सर्वांना मास्क लावणे बंधनकारक आणि अनिवार्य झाले आहे. मात्र, मास्क बराच काळ लावावा लागत असल्याने त्याच्या बंधांच्या ताणाने कान दुखत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यावर पश्चिम बंगालच्या पूर्बा (पूर्व) वर्धमान जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीने कोविड-कामगारांना समोर ठेवून एक साधन डिझाइन केले असून तिच्या या अभिनव “कानावरील ताण कमी करण्याच्या’ साधनाला राष्ट्रीय विज्ञान स्पर्धेत मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
मेमरी येथील विद्यासागर स्मृती विद्यामंदिर शाखेची दिगंतिका बोसने हे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इग्निटेड माइंड चिल्ड्रेन क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन अवॉर्ड प्राप्त केले आहे. या ऍवॉर्डसाठी एकूण 9 प्रकल्पांची निवड करण्यात आली होती. एकूण 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण 9,000 प्रवेशिका आल्या होत्या.
“आरोग्य कर्मचारी, सामान्य नागरिक आणि इतरांना बऱ्याच काळासाठी मास्क घालावे लागतात, ज्यामुळे कानांमध्ये सतत दबाव निर्माण होतो आणि वेदना होतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी मी वापरलेल्या प्लास्टिक किंवा लवचिक बोर्डाच्या मदतीने हे बॅंड डिझाइन केले आहेत. समाजोपयोगी शोधासाठी मला डॉ. कलाम यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने मी अशिकच आनंदी आहे, असे 17 वर्षीय दिगंतिका सांगते.
कानावरील दाब कमी करण्याचे साधन कसे कार्य करते?
“हेड बॅंड एक फेसमास्क विस्तारक आहे जो कानातील पट्ट्या सहजपणे जोडतो आणि आपल्या डोक्याच्या मागील बाजूस गुंडाळण्यासाठी विस्तारित करतो. परिणामी, कानांवर दबाव येणार नाही आणि म्हणून अस्वस्थता किंवा वेदना होणार नाही. एप्रिलमध्ये, मी एक एअर “प्रोव्हिडिंग आणि व्हायरस नष्ट करणारा मुखवटा’ तयार केला होता