ISIS चा मोठा प्लॅन उघडकीस; भारतीय मुस्लिमांचे ‘ब्रेन वॉश’ करून…

नवी दिल्ली – भारताविरूद्ध सुरू असलेला आयएसआयएस आतंकवादी संघटनेचा मोठा प्लॅन उघडकीस आला आहे. आयएसआयएस आतंकवादी संघटनेचे एक द्वेषपूर्ण डिजिटल मासिक हाती लागले आहे. यामध्ये आयएसआयएस आतंकवादी भारतातील मुस्लिम बांधवांचे ब्रेन वाॅश करून त्यांना भारताविरूद्ध शस्त्रे हातात घ्यायला सांगत आहेत. मासिकात लिहिलेल्या एका लेखानुसार, मुस्लिमांना भारत सरकार विरूद्ध ‘जिहाद’ चा रस्ता निवडण्याचे सांगितले आहे.

बाबरी मशीदचा बदला घेणार –

भारतीय मुस्लिमांना बाबरी मशीदबाबतचा बदला घेण्यासाठी भडकवले जात आहे. या मासिकात बाबरी मशीदीच्या विध्वंस संबंधातील फोटो जोडलेले आहेत. यात बाबरी मशीदीचा बदला घेतला जाणार असल्याचे लिहिले आहे. द्वेषपूर्ण असलेले हे मासिक भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोक्याचे ठरू शकते. या मासिकातील लेखाची माहिती समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणादेखील अलर्ट झाल्या आहेत.

याच मासिकाने सीएए-एनआरसी विरूद्ध मुस्लिमांना भडकावले होते –

गेल्या काही दिवसांपूर्वी याच मासिकाने CAA-NRC ला विरोध करणाऱ्या लोकांना भडकवले होते. व्हॉईस ऑफ हिंद या ऑनलाईन मासिकाच्या आवृत्तीत आयएसआयएसने नागरिकत्व सुधारणा अधिनियम (सीएए) आणि राष्ट्रीय नागरी नोंदणी (एनआरसी) च्या निषेधार्थ अनेक ठिकाणी हिंसाचार पसरविण्यासाठी भारतीय मुस्लिमांना प्रोत्साहित करणारे लेख प्रकाशित केले. या नियतकालिकात असे म्हटले आहे, की
आयएसआयएस नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मुस्लिमांच्या पाठीशी उभे आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.