अभिनेत्री करिना कपूर-खान सतत चर्चेत असते. तिचे लुक्स, कपडे यामुळे ती फॅशन आयकॉन मानली जाते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. परंतु सोशल मीडियापासून करिना दूरच होती. करिनाच्या चाहत्यांनी तिला अनेकदा सोशल मीडियावर येण्याची विनंती केली होती. अखेर चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली असून बेबो म्हणजेच करिनाची आता इन्स्टाग्रामर एन्ट्री झाली आहे.
नुकतेच तिने तिच्या लहानपणीचा एक फोटो चाहत्यांसह शेअर केला आहे. या फोटोला तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. त्यात तिने म्हटले आहे की, जेव्हा मी लहान होते तेव्हा कोणी माझ्या जवळ यायचे तेव्हा मी दोन हात लांबच राहण्याचा इशारा देणारा हा फोटो असल्याचे तिने म्हटले आहे.
कोरोनाची लागण होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून हस्तांदोलन करमे, मीठी मारणे, नियमित पणे हात धुर राहणे अशा काळजी घेणा-या टीप्स दिल्या जात आहे. त्याच अनुषंगाने करिनाचाही हा फोटो असल्याचे तिने यांत म्हटल्याचे पाहायला मिळत आहे.
कोरोना व्हायरसचा धोका सतत वाढत असताना सामान्य जनतेपासून तर बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच या व्हायरसच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी विलीगीकरणाचा मार्ग पत्करल्याचे चित्र आहे.