मुंबई – सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग हादरले आहे. आता पर्यंत या प्राणघातक विषाणूपासून अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, या प्राणघातक विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालीकेच्या सेटवर दक्षता म्हणून, कलाकारांपासून ते अगदी तंत्रज्ञांपर्यंत सगळ्यांचीच मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.