बंगळुरु :- वेलेन्सिया (स्पेन) येथे होत असलेल्या पाच देशांच्या नेशन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा पुरुष व महिला हॉकी संघ सोमवारी रवाना झाला. पुरुष संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंगकडेच कायम राखण्यात आले आहे. मात्र, महिला संघाचे नेतृत्व सविताकडे सोपवण्यात आले आहे.
भारताचा पुरुष व महिला या दोन्ही संघांचा सलामीचा सामना येत्या १५ डिसेंबरला यजमान स्पेनशी होणार आहे. या सामन्यानंतर भारताचे सामने जर्मनी, फ्रान्स व बेल्जियमशी होणार आहेत. या स्पर्धेतील कामगिरी तसेच त्यानंतर भारतात रांचीत होणारी पात्रता स्पर्धा भारताच्या दोन्ही संघांसाठी आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी अत्यंत महत्वाची आहे.
Five-Nations Tournament 2023 : स्पेन दौऱ्यासाठी महिला हॉकी संघाची घोषणा….
महिला संघाचे सामने बेल्जियमशी १६, जर्मनीशी १९ व आयर्लंडशी २१ डिसेंबरला होणार आहे. पुरुष संघाची सलामी स्पेनशी झाल्यावर त्यांना बेल्जियमशीच १६, जर्मनी १९ व फ्रान्सशी २० डीसेंबरला खेळायचे आहे.
महिला संघ : गोलरक्षक : सविता (कर्णधार), बिचू देवी खरीबम; बचावपटू : निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी, गुरजीत कौर, अक्षता आबासो ढेकळे; मिडफिल्डर: निशा, वैष्णवी विठ्ठल फाळके, मोनिका, सलीमा टेटे, नेहा, नवनीत कौर, सोनिका, ज्योती, बलजीत कौर; फॉरवर्ड: ज्योती छेत्री, संगीता कुमारी, दीपिका, वंदना कटारिया (उपकर्णधार), सौंदर्य डुंगडुंग, शर्मिला देवी.