#SP Balasubrahmanyam: संगीताचा बादशहा हरपला

आवाजाचा जादूगार असलेले एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी 40,000 गाण्यांना आपला आवाज दिला

मुंबई- अलौकिक आवाजाने रसिकांवर मोहिनी घालणारे प्रसिद्ध पार्श्वगायक ‘एस.पी. बालासुब्रमण्यम’ यांची आज (दि.25) प्राणज्योत मालवली. बालसुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे दि. 5 ऑगस्ट रोजी त्यांना चैन्नईतील एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, कोरोनावर मात करूनही प्रकृती न सुधारल्याने त्यांची तब्येत काही दिवसांमध्ये खालावत होती. अखेर त्यांनी आज खाजगी रूग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, आवाजाचा जादूगार असलेले एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी आजवर तेलगू, तामिळ, कन्नड, हिंदी, मल्याळम अश्या अनेक भाषांमध्ये जवळपास 40,000 गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्याचीच एक झलक आज आपण पाहुयात…

मेरे रंग में रंगने वाली – 

पहला पहला प्यार है – 

साथिया.. तूने क्या किया – 

आजा शाम होने आई – 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.