अबब ! मेक्सिकोमध्ये सापडला माणसापेक्षा मोठा उंदीर

Madhuvan

मेक्सिको सिटी : मेक्सिकोची राजधानी असलेल्या मेक्सिको सिटीमध्ये भूमिगत नाले सफाई करीत असताना कर्मचाऱ्यांना माणसापेक्षा मोठ्या आकाराचा उंदीर सापडल्याने सर्वजण हैराण झाले. या नाल्यामधील लाखो लिटर पाणी उपसले जात असताना कर्मचाऱ्यांना हा उंदीर सापडला.

अधिकाऱ्यांनी या महाकाय उंदराची अधिक तपासणी केली असता, हॅलोविनसाठी तयार केलेला हा नकली उंदीर चुकून गटारात पडल्याचे लाक्षात आले. दरम्यान, या महाकाय उंदराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा उंदीर एवढा मोठा होता कि, त्याच्या आसपास उभी असलेली माणसे खूपच छोटी दिसत होती.

शहरातील एका महिलेने पुढे येऊन या उंदराच्या रहस्याचा उलगडा केला. एवलिन नावाच्या या महिलेने हॅलोविन समारंभासाठी हा महाकाय उंदीर तयार केला होता. चुकून तो नाल्यात पडल्याने वाहत वाहत लांब गेला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.