पुणे : दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत व्हाॅलीबाॅलमध्ये भारतीय महिला व पुरूष संघाने विजय नोंदविला आहे. स्पर्धेत भारतीय पुरूष संघाने बांगलादेशचा २५-१८, २५-१४, २५-१५ असा पराभव केला.
दुसरीकडे भारतीय महिला संघानेही स्पर्धेत नेपाळ महिला संघाचा २६-२४, २५-१२, २५-१६ असा पराभव करत विजय संपादित केला आहे. आता स्पर्धेत भारतीय महिला संघाचा पुढचा सामना बांगलादेशविरूध्द तर भारतीय पुरूष संघाची लढत नेपाळशी होणार आहे.